आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची कारवाई:शिवनी भागातील मोठ्या नाल्यांच्या सफाईत अडचण ठरलेले अतिक्रमण हटवले, कायमस्वरुपी कारवाई हवी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवनी येथील नाले सफाईच्‍या कामामध्‍ये अडचण ठरणारे तसेच तसेच वाहतुकीत खोळंबा झालेले नाल्यावरील अतिक्रमण हटवले. आयुक्‍त कविता द्विवेदी यांच्‍या आदेशान्‍वये महानगरपालिका दक्षिण झोन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने चारही झोन मध्ये मान्सुन पूर्व नाला सफाईचे काम सुरु आहे. शहराच्या विविध भागात मोठ्या नाल्यांवर अनेकांनी अतिक्रमण करुन लहान-मोठी दुकाने थाटली आहेत. यामुळे नाल्याची साफसफाई योग्यरित्या करता येत नाही. या प्रकारामुळे नाला सफाई करताना अडचणी येतात. तसेच वाहतुकीची कोंडी होती.

शिवनी भागात नाल्यावर अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमण धारकांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढुन घेण्याची सुचना दिली. मात्र, या सुचनेकडे अतिक्रमण धारकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शिवनी भागात नाल्यावरील पान टपरी, चहा टपरी, प्लास्टिकची खेळणी, भांडे विक्री करणारी दुकाने दक्षिण झोन कार्यालय व अतिक्रमण विभागाने हटवली. ज्या व्यावसायीकांनी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी आपले अतिक्रमण स्वत: काढावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अतिक्रमण पुन्हा जैसे-थे होणार

मान्सुनपूर्व नाल्यांची साफसफाई करण्यासाठी मोठ्या नाल्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढले असले तरी नाला सफाईनंतर पुन्हा नाल्यावर अतिक्रमण होईल. महापालिकेने नाल्यावर अतिक्रमण होवू नये, यासाठी कायम स्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

बातम्या आणखी आहेत...