आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:दक्षिण झोन अंतर्गत शिवणी येथील नाल्यावरील अतिक्रमणाचा सफाया ; अतिक्रमण विभागाने हटवली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये महानगरपालिका दक्षिण झोन अंतर्गत शिवनी येथील नाले सफाईच्या कामामध्ये अडथळे निर्माण करणारे तसेच वाहतुकीत अडचण निर्माण करणाऱ्या अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. महापालिकेच्या वतीने चारही झोनमध्ये मान्सूनपूर्व नाला सफाईचे काम सुरु आहे. विविध भागात मोठ्या नाल्यांवर अनेकांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. या प्रकारामुळे नाला सफाई करताना अडचणी येतात. तसेच वाहतुकीची कोंडी होती. ही बाब लक्षात घेवून शिवनी भागात नाल्यावरील पान टपरी, चहा टपरी, प्लास्टिकची खेळणी, भांडे विक्री करणारी दुकाने दक्षिण झोन कार्यालय व अतिक्रमण विभागाने हटवली. ही कारवाई सहा.आयुक्‍त अतिक्रमण जगदीश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनात दक्षिण झोन क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, सहा.कर अधीक्षक प्रशांत बोळे, आरोग्‍य निरीक्षक आदर्श गोराने, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, योगेश कंचनपुरे, जीवन मानकीकर, संतोष भगत, सैय्यद रफीक, रूपेश इंगळे, वैभव कवाळे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...