आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक पर्व महोत्सवाला प्रारंभ झाला अाहे. अशोक पर्व महोत्सव यशस्वी व्हावा, सम्राट अशोक यांची गौरव गाथा जनमानसात पोहचावी, यासाठी सम्राट अशोक गौरव रथ यात्रा काढण्यात आली. समाराेप ३१ मार्च राेजी हाेणार अाहे. चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा विजय आठवले यांचे नेतृत्वात रथ यात्रा झाली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,सचिव प्रा सुनील कांबळे ,व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे, प्रा डॉ संदीप भोवते, डॉ विलास तायडे, निरंजन वाकोडे, विद्याधर मोहोड,अनील गवई ,वासुदेव गवई ,बी. जी.इंगळे ,मंदा सिरसाट ,कल्पना महाले ,रेखा चव्हाण, कल्पना खंडारे ,उज्वला नरवाडे, सुशीला दामोदर, कविता शिरसाट, वंदना रावळे ,आशा कांबळे यांची उपस्थिती होती.
यासाठी राबवले अभियान सम्राट अशोक यांची जयंती,राष्ट्रीय पर्व म्हणून घोषित व्हावी, जयंती शासन प्रशासन,आणि भारतीय जनतेने उत्साहात साजरी केली पाहिजे, प्रतिमा आणि ,अशोक स्तंभ जिल्हाधिकारी कार्याल ,तहसील, ग्राम पंचायत , शाळा,महा िद्यालये ,विविध शासकीय , निम शासकीय कार्यालयात ठिकाणी असावेत, यासाठी जागर अभियान रथ यात्रेच्या माध्यमातून राबवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.