आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांचे , लोककल्याणकारी आणि आदर्श प्रशासकीय धोरण हेच भारताच्या सामाजिक,शैक्षणिक आर्थिक,सांस्कृतिक सर्वागीण विकासासाठी उपकारक ठरले असून त्यांनी पहिल्यांदाच भारतातील राजकीय व्यवस्थेत लोकशाही मूल्ये रुजविली असे प्रतिपादन सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा विजय आठवले यांनी केले. ते उमरी येथील विश्र्वशांती बौद्ध विहारातील एकदिवसीय धम्म ध्यान शिबिरात बोलत होते. प्रारंभी भगवान बुद्ध,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव पळसपगार हे होते. उदघाटक म्हणून जयंत मसने हे हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे.के.पळस गार,सुभाष खंडारे ,प्रकाश पळसपगार,आत्माराम पळसपगार, विनोद परघरमोर, लीलाबाई पळसपगार, प्रा. डॉ बाळकृष्ण खंडारे, प्रा डॉ संदीप भोवते, विद्याधर मोहोड, निरंजन वाकोडे अनिल गवई म्हणून उपस्थित हाेते. महाेत्सवात सहभागी व्हा सम्राट अशोक यांचे भारताच्या जडण घडणीत प्रचंड योगदान असतानाही सरकारच्यावतीने त्यांची जयंती साजरी केल्या जात नाही. ही शोकांतिका अाहे, असे नाही, असे प्रा. अाठवले म्हणाले. ३१ मार्च रोजी आयोजित सम्राट अशोक पर्व महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून महान सम्राटाचा प्रत्येकाने सन्मान करावा , असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पळसपगार यांनी केले. सूत्र संचालन जे.के. पळसपगार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.