आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘सर्व शिक्षा अभियातीलनातील कर्मचाऱ्यांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत सामावून घ्या,’ अशी मागणी अभियानातील कर्मचाऱ्यांकडून िशक्षक आमदार किरण सरनाईक यांच्याकडे करण्यात आली. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत गत २० वर्षांपासून निव्वळ करार तत्त्वावर ५ हजार ८०० पेक्षा जास्त कर्मचारी विविध पदावर अल्पशा मानधनावर कार्यरत आहेत. कार्यालयात रिक्त असणाऱ्या इतर पदाचा अतिरिक्त भार या कर्मचाऱ्यांवर आहे. विनंती करूनही शासनाने अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित केलेले नाही. अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा व इतर कोणत्याही सोयी सुविधांचा लाभ दिलेला नाही. सरकारी धोरणानुसार करार कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरवर्षी नैसर्गिक वाढ मंजूर करण्यात येते.
तथापि, सन २०१८-१९ पासून अशी कोणतीही वाढ आमच्या मानधनात शासनाने केलेली नाही. नोकरीतील असुरक्षितता व मानसिक आर्थिक विवंचनेत आमचा प्रत्येक कर्मचारी जीवन जगत आहे. उच्च शैक्षणिक पात्रता व प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, आमची शिक्षण विभागाला अत्यंत आवश्यकता आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. रिक्त पदांचा भार पडत असल्यामुळे याबाबत विचार करावा असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या केल्या मागण्यासर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करावे.वेतनात १ जानेवारी २०२२पासून किमान दुप्पट वाढ करण्यात यावी.शासनाकडून किमान ५० लाख परत मिळतील, अशा आरोग्यदायी वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळावा.अपघात जीवन विमा योजना कवच सेवा- सुविधांचा लाभ मिळावा. अकाेला- आमदार िकरण सरनाईक यांना िनवेदन सादर करताना सर्व िशक्षा अभियानातील कर्मचारी व शिक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.