आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी सरकारी, निमरसकारी कर्मचारी मंगळवारी संपावर गेले. सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणारी महापालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असे जिल्ह्यातील हजाराे कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यांनी ‘एकच मिशन, जुनी पेंशन’ असा नारा देत रॅली काढली. एकिकडे संपामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट हाेता तर दुसरीकडे मात्र कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांप्रमाणे रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन केले.
संपामुळे नागरिक मात्र वेठीस धरले गेले. राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू न करता नवीन अंशदायी योजना लागू केली आहे. ही नवी योजना रद्द करून सरसकट सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र नेरकर, जि.प. कर्मचारी महासंघाचे सुनील जानोरकर, महसूल कर्मचारी संघटनेचे वैजनाथ कोरकणे, ग्रामसेवक संघटनेचे रवी काटे, शिक्षक श्याम कुलट, देवानंद माेरे, राजेश देशमुख सहभागी झाले हाेते.
असा काढला माेर्चा : सकाळी िजल्हाधिकारी कार्यालयापासून कर्मचाऱ्यांनी माेर्चा काढला. रॅली शासकीय वैद्यकीय महािवद्यालय, सर्वाेपचार रुग्णालय, अशाेक वाटिका, मदनलाल धिंग्रा चाैक या गांधी राेड या मार्गाने जात माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. िजल्हाधिकारी कार्यालयाजवळ कर्मचारी संघटनांचा मंडप टाकण्यात आला हाेता.
कार्यालयांना कुलूप : संपामुळे िजल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या अनेक िवभागांना कुलूप हाेते. २) मिनीमंत्रालय नावाने परिचित असलेल्या जिल्हा परिषदेत राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकत्यांची वर्दळ हाेती.मात्र गर्दी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जि.प. अध्यक्षांसह इतर सभापतींच्या कक्षाला कुलूप दिसून आले. संपात चालकांचाही समावेश असल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकाऱ्यांची वाहने उभी हाेती.
व्यवहार ठप्प : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे व्यवहार ठप्प झाले हाेते. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे सहा तालुक्यात सहा व जिल्हाधिकारी कार्यालयात तीन असे नऊ कार्यालय आहेत. मात्र दस्त नोंदणीचे जवळपास २२९ व्यवहार संपामुळे झाले नाहीत. यातून मिळणाऱ्या ९८ लाखांच्या महसूलावर पाणी साेडावे लागले.
कर्मचाऱ्यांनी घातल्या टाेप्या
माेर्चात सहभाग कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असे मुद्रित केलेली पांढरी टोपी हाेती. याव्यतिरिक्त मोर्चात काळ्या व पांढऱ्या मुखवट्यासह कपड्यात सहभागी दोन कर्मचाऱ्यांनी जुनी व नवीन पेन्शन वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. याव्यतिरिक्त मोर्चात घोषणाही देण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.