आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोजगार संधी; २२४ पदांसाठी आज भरती प्रक्रिया

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बेरोजगारी कमी हाेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवारी, ८ ऑगस्टला केले आहे. यात २२४ पदांसाठी भरती प्रक्रियेत अंतर्गत पहिला टप्पा हाेणार आहे. मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक, युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले आहे.

गत दोन वर्षे कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार गेले. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासन व स्थानिक प्रशासनाकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सहभागा होण्यासाठी कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळाला भेट द्यावी लागणार आहे. याठिकाणी उमेदारांना आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा लागेल. तसेच इतर जिल्‍ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा
ज्‍या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्‍यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर तत्‍काळ नोंदणी करुन आपल्‍या शैक्षणिक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाइन अर्ज करुन संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी www. rojgar. mahaswayam. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. जॉबसिकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधारक्रमांक आणि पासवर्ड वापरुन लॉगइन करावे लागणार आहे. आपल्या प्रोफाइल मधील होमपेजवरुन पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वखर्चाने व शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साइझ फोटोसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३८४९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी मिळेल संधी
रोजगार मेळाव्‍यात उत्कर्ष स्मॉल फायनन्स लि.मध्ये कारंजा, वाशीम, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव शाखेकरीता कलेक्शन ऑफिसरचे २५ पदे व कॅशीअरची २५ पदे आहेत.रॉयल क्रॉप सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि.अकोला येथे प्रोडक्शन सुपरवायझर व स्टोअरकिपर पदाचे प्रत्येकी या ठिकाणी मिळेल संधी
एक, अकॉऊंटंट, डिसपॅच ग्रिस व सिक्युरिटी गार्ड पदाचे प्रत्येकी दोन, बँक ग्रीस एक्झेकेटिव्ह पदाचे चार तर वेल्डर, फिटर व इलेक्ट्रीशियन पदाचे १२ अशी एकूण २४ पदे आहेत. क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि. येथे ट्रेनी केंद्र मॅनेजरची ५०पदे आहेत. बडवे इंजिनियरिंग औरंगाबाद आणि पुणे येथे प्रशिक्षणार्थीचे १०० पदे आहेत.

बातम्या आणखी आहेत...