आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनदोस्त:गवळीपुरा मार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी गवळीपुरा मार्गावर रस्त्या लगतचे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण जमीनदोस्त केले. पथकाने नाल्यावरील बांधलेले पक्के बांधकामही काढल्याने नाला सफाईचा मार्गही मोकळा झाला.

मनपाच्या वतीने २१ नोव्हेंबरपासून शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्वच मार्गावर ही मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी ही मोहीम गवळीपुरा भागात राबवली. माळीपुरा चौकातून गवळीपुरामार्गे तसेच होमिओपॅथिक कॉलेजपासून अकोला कृषी उत्पन्न समिती बाजारात जाता येते. कृषी उत्पन्न बाजार समितीत जाण्यासाठी हे दोनच मार्ग आहेत. यापैकी माळीपुरा चौकमार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...