आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हुतात्मा चौक ते जुना इन्कम टॅक्स चौकातील अतिक्रमण मनपाने हटवले

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने हुतात्मा स्मारक चौक ते जुना इन्कम टॅक्स चौका दरम्यान रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.शहरात शहर कोतवाली ते मदनलाल धिंग्रा चौक, खुले नाट्यगृह चौक ते फतेह चौक, फतेह चौक ते दामले चौक, टिळक मार्ग, सुभाष मार्ग, जयहिंद चौक आदी रस्त्या सोबतच गोरक्षण मार्गावर रस्त्याच्या कडेला लघु व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.

अनेकांनी बांबूचे छत तयार केले आहे. नागरिक खरेदी करण्यासाठी थांबतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. ही बाब लक्षात घेऊन मनपाच्या अतिक्रमण पथकाने हुतात्मा स्मारक ते जुना इन्कम टॅक्स चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील अतिक्रमण काढले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान अतिक्रमण हटाव पथकाने ही मोहीम राबवली तरी पथकाकडे जेसीबी मशीनही प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे कोणतीही सुविधा नसताना कर्मचाऱ्यांना ही मोहीम राबवावी लागली.

बातम्या आणखी आहेत...