आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:ग्राम निंबा येथील 70 एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण अखेर काढले

मूर्तिजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम निंभा येथे शासकीय ८५ एकर जमिनीपैकी एकूण ७० एकर जमिनीवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते.

अतिक्रमण हटाव मोहीम उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार प्रदीप पवार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, नायब तहसीलदार बनसोड, विस्तार अधिकारी कीर्तने, मंडळ अधिकारी नागोलकर तसेच तलाठी व ग्रामसेवक या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. कडक पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवले.

लवकरच या संपूर्ण शेत जमिनीवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुक्रवारी करण्यात आला. अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांनी वृक्षारोपण केले. २९ जुलै रोजी जवळपास २०० च्यावर वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबंधित सर्व अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांची उपस्थिती होती. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी देखील पुढाकार घेऊन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून वृक्षलागवड मोहीम राबवावी जेणेकरून पर्यावरण संतुलनास हातभार लावता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

ग्राम दुर्गवाडा येथे वृक्षदिंडी :तालुक्यातील ग्राम दुर्गवाडा येथे शुक्रवारी येथील शासकीय जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली. तत्पूर्वी संपूर्ण गावातून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. दुर्गवाडा येथे १२५ एकर जमीन असून या ठिकाणी ७५० वृक्षांची लागवड केली जात असल्याची माहिती दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार प्रदीप पवार,मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव,नायब तहसीलदार बनसोड,विस्तार अधिकारी कीर्तने, मंडळ अधिकारी नागोलकर तसेच तलाठी व सरपंच, सदस्य यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...