आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात अतिक्रमण हटाव मोहीम:किल्ला चौक - बाळापूर नाका मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई; नागरिकांनी पथकासोबत घातला वाद

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी 13 डिसेंबर रोजी किल्ला चौक ते जुना बाळापूर नाका या मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई केली. कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांनी पथकासोबत वाद घातला. मात्र नंतर वाद निवळला. कारवाई दरम्यान नाल्याच्या समोर केलेले अतिक्रमण मात्र जैसे-थे ठेवण्यात आले.

महापालिकेच्या वतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. रस्त्याच्या कडेला केलेले कच्चे, पक्के बांधकाम तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाचा सफाया केला जात आहे. ही मोहिम शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर राबवली जाणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने किल्ला चौक परिसरातील दुकाना समोर बांधलेले कच्चे शेड, नाल्यावर बांधलेले बांधकाम, हॉटेल व्यावसायीकांनी दुकाना समोर बांधलेले ओटे आदींचा सफाया करण्यात आला. नाल्यावरील कॉक्रीटचे बांधकाम पाडतांना परिसरातील नागरिकांनी पथकासोबत वाद घातला. मात्र काही वेळातच हा वाद मिटला. दरम्यान या मोहीमेत काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता.

घटनास्थळी झालेली गर्दी पोलिसांनी दूर केली नाही. त्यामुळे मोहीम राबविताना पथकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. या मार्गावर नाल्या समोर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाला सफाई करताना अडचणी येतात. काही नागरिकांनी नाल्या समोर केलेले बांधकाम पाडण्यात आले तरी मोठ्या प्रमाणात नाल्या समोर केलेले बांधकाम जैसे-थे ठेवण्यात आले. त्यामुळे एकाचे पाडले दुसऱ्याचे का नाही? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

ही मोहीम पश्चिम झोनचे झोनल अधिकारी दिलीप जाधव, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे,अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाळे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धिरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ताचे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली.

बातम्या आणखी आहेत...