आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पाडापाडी:कौलखेड चौक - खडकी मार्गावरील अतिक्रमण हटवले, ओट्यांसह पक्के अनधिकृत बांधकाम पाडले

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील गजबजलेल्या कौलखेड चौक ते खडकी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण हटवण्यात आले. यामध्ये लघु व्यावसायीकांनी बांधलेले ओटे तसेच पक्के अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले.

महापालिकेने 21 नोव्हेंबर पासून शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. टप्प्या - टप्प्याने ही मोहीम सर्वच मार्गावर राबविली जाणार आहे. मात्र ज्या मार्गावर ही मोहीम राबविली जाते, त्या मार्गावर दुसऱ्या पुन्हा अतिक्रमण जैसे - थे होते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात अर्थ काय? अशी चर्चा ही या निमित्ताने सुरू आहे.

दरम्यान 12 डिसेंबर रोजी कौलखेड चौक ते खडकी मार्गावर मोहिम राबविण्यात आली. कौलखेड चौकात भाजी विक्रेत्यांसह विविध लघु व्यावसायीकांनी रस्त्यालगत बांधलेले सिमेंट कॉक्रीटचे ओटे, बांबुच्या ताट्याचे दुकाने, टपऱ्या तसेच रस्त्यालगत पक्के बांधलेले अतिक्रमण काढले. अतिक्रमण हटाव मोहिमेत सोमवारीही पोलिस बंदोबस्त नव्हता. तसेच रहदारी पोलिसही उपस्थित नसल्याने मोहीमे दरम्यान रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती.

ही मोहीम दक्षिण झोनचे झोनल अधिकारी दीपक निकाळजे, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे,अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाळे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धिरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ता चे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली.

मंगळवारी अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने किल्ला चौक ते भांडपूरा चौक ते जुना बाळापूर नाका या मार्गावर अतिक्रमण मोहिम राबविली जाणार आहे. हा भाग संवेदनशिल असल्याने पथकाने यापूर्वी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. आतापर्यंत मोहीमे दरम्यान पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारी पोलिस बंदोबस्त मिळणार की पोलिस बंदोबस्ता शिवाय ही मोहीम राबविली जाणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...