आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात घरांवर चालला जेसीबी:अतिक्रमणविरोधी पथकाची जुन्या आरटीओ रस्त्यालगत बांधलेले जीने, शौचालयावरही कारवाई

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवार 8 डिसेंबरला रोजी जुना आरटीओ कार्यालय मार्गावरील रस्त्यावर बांधलेले कच्चे-पक्के बांधकाम जमीनदोस्त केले. यावेळी अतिक्रमणधारकांनी पथकासोबत हुज्जत घातल्याने महिला सुरक्षा रक्षकासोबत गैरवर्तन केले.

पोलिस संरक्षण मागुनही पोलिस प्रशासनाने केवळ दोन पोलिस शिपाई घटनास्थळी पाठवले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला खऱ्या अर्थाने स्वबळावर तणावपूर्ण अतिक्रमण हटाव मोहिम राबवावी लागली.

जुना आरटीओ कार्यालय ते संत तुकाराम चौक हा रस्ता 18 मिटरचा आहे. मात्र या मार्गावर जवळपास 8 मिटर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. विशेष म्हणजे या भागातील नागरिकांनी रस्त्यावरच शौचालय, घराचे जीने, संरक्षक भिंत, टिनाची घरे उभी केली आहेत. पथकाने या अतिक्रमण धारकांना चार दिवसापूर्वी अतिक्रमण काढून घेण्याची सुचना केली होती. मात्र अतिक्रमण मोहिम सुरू झाल्या नंतरही अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे पथकाला कारवाई सुरू करावी लागली.

पथकाने रस्त्यावर लावलेले किराणा दुकान, चहाची दुकाने, नास्त्याची दुकाने, चार शौचालय, टिनाची घरे आदी जमिनदोस्त केल्या. या प्रकारामुळे मोहीमे दरम्यान तणाव निर्माण झाला होता. परिसरातील पुरुषांपेक्षा महिला समोर आल्याने पथकातील कर्मचारीही हतबल झाले होते. या दरम्यान केवळ दोन पोलिस शिपाई उपस्थित होते. परंतु अशाही परिस्थितीत अतिक्रमण हटाव पथकाने आपली कारवाई फत्ते केली.

ही मोहीम दक्षिण झोनचे झोनल अधिकारी दीपक निकाळजे, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे,अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाळे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धिरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ता चे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली.

एका पक्क्या घरावर कारवाई करण्यात आली. घराचे काम पाडताना पाहून संबंधित घरातील महिलेला चक्कर आली. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. महिला शुद्धीवर आल्याने तणाव निवळला.

महिला सुरक्षा रक्षकांशी केले गैरवर्तन

रस्त्यावर बांधलेले कच्चे घर पाडताना संबंधित महिलांनी पथका सोबत हुज्जत घातली. महिला असल्याने पथकातील कर्मचाऱ्यांना दोन पावले मागे यावे लागले तर पोलिसही महिलामुळे काही करू शकले नाहीत. महिला पोलिस पथकासोबत नसल्याने अखेर मनपाच्या महिला सुरक्षा रक्षकांनी कारवाई मज्जाव करणाऱ्या महिलांना मागे घेतले. यातून महिलांनी महिला सुरक्षा रक्षकांसोबत वाद घातला.

बातम्या आणखी आहेत...