आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:टॉवर चौक ते जठार पेठ चौक मार्गावर राबवली अतिक्रमण हटाव मोहीम

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील पूर्व झोन येथील टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक ते जठारपेठ चौकापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे टीनशेड, हातगाड्या, ओटे या माध्यमातून केलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये हटवण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान त्या परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठानात व्यवसाय परवानाबाबत बाजार विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली.

शहरातील नागरिकांनी, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे अतिक्रमणे स्वतः काढून प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच प्रशासनाद्वारा अतिक्रमणे काढल्यानंतर पुनश्च अतिक्रमणे केल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असून, अतिक्रमणधारकांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपाने केले. ही कारवाई पूर्व झोन क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, पूर्व झोन सहायक देवेंद्र भोजने, कनिष्ठ अभियंता तुषार जाने आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...