आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे प्रशासनाचे आवाहन‎:अकोल्यात 13 मार्चपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम‎

अकोला‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील मुख्य मार्गावर‎ पुढील आठवड्यात साेमवार १३‎ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम‎ राबवली जाणार आहे. दरम्यान मुख्य‎ मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वत:‎ अतिक्रमण काढावे, असे आवाहन‎ महापालिका प्रशासनाने केले आहे.‎ प्रशासनाने नोव्हेंबरपासून मुख्य‎ मार्गावरील अतिक्रमण हटवण्याकडे‎ लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत‎ तीन मोहीमा राबवल्या असून,‎ अद्यापही मोहीम सुरुच आहे. मात्र‎ आता पुन्हा साेमवार १३ मार्चपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात‎ येणार आहे.

उत्‍तर झोन अंतर्गत गांधी‎ चौक ते सिटी कोतवाली चौक ते‎ टिळक रोड ते मानेक टॉकीजपर्यंत,‎ माळीपुरा चौक ते मोहता मिल स्‍मशान‎ भूमी ते तपे हनुमान मंदीरपर्यंत,‎ मनकर्णा प्‍लॉट ते तपे हनुमान‎ मंदीरपर्यंत याचसोबत पश्चिम झोन‎ अंतर्गत सिटी कोतवाली ते जयहिंद‎ चौक ते किल्‍ला चौकापर्यंत आणि‎ किल्‍ला चौक ते हरिहरपेठ ते वाशीम‎ बायपास चौक या मार्गावर अतिक्रमण‎ हटाव मोहीम राबवली जाणार आहे.‎ या मार्गावर ज्यांनी रस्त्यावर‎ अतिक्रमण केले आहे, त्या‎ अतिक्रमण करणाऱ्यांनी आपले‎ अतिक्रमण स्वत: काढावे अन्यथा‎ महापालिका अतिक्रमण हटाव‎ पथकाच्या वतीने केलेले अतिक्रमण‎ काढण्यात येईल, असा इशाराही‎ प्रशासनाने दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...