आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात अतिक्रमण हटाव मोहीम:व्यावसायिक व पथकामध्ये झटापट; साहित्याची नासधूस

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मुख्य मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहीमेदरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व व्यावसायिक यांच्यात झटापट झाली. मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र नंतर ही परिस्थिती निवळली.

शहरातील मुख्य मार्गावर व मुख्य मार्गाच्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दुकाने थाटण्यात येतात. रस्त्यावरच हातगाड्यांवर विविध साहित्याची विक्री होते. परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. त्यामुळे काही दिवसांपासून मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान 10 डिसेंबर रोजी सकाळी मनपाने गांधी रोडपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीमेला प्रारंभ केला. ही मोेहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल, गांधी चौक, गांधी रोड, महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली) या मार्गाने राबविण्यात येत आहे.

कुठे काय घडले?

  • मनापासूनमोरील व्यावसायिक वाणिज्य संकुलातील दुकानांसमोर व्यवसायकांनी दुकानात जाण्यासाठी लोखंडी पिंजरे ठेवण्यात आले आहेत. मात्र हे पिंजरे ग्राहकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे मनापाच्या पथकाने पिंजरे जप्त करण्यास सुरुवात केली. या कार्यवाहीला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यांनी पिंजराजवळ असलेल्या आमच्या दुचाकींची नासधूस झाल्यास खबरदार, असा इशारा दिला .मात्र मनपाच्या पथकाने हा विरोध मोडून काढत कार्यवाही सुरूच ठेवली. अखेर काही ठिकाणचे लोखंडी पिंजरे जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले, तर काही जप्त करण्यात आले.
  • गांधी रोडवर रस्त्याच्या कडेला तयार कापडाचे दुकाने आहेत. हे कपडे रस्त्यावरच विविध साहित्याच्या आधारे टांगण्यात येतात. मनपाच्या पथकाने हे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली. पथकाने लोखंडी खुर्चीसह अन्य साहित्याची जेसीबीने नासधूस करण्यास प्रारंभ केला.या कार्यवाहीला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे मनपा पथक व संबंधित व्यापाऱ्यांमध्ये झटापट झाली. दोन्हीकडून धक्काबुक्की करण्यात आली.मनपाच्या पथकाने विरोध झुगारून कार्यवाही सुरूच ठेवली. अखेर काहींनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला.

गांधी रोडवर वाहतुकीची कोंडी

मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानंतर गांधी रोडवर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक या दरम्यानची वाहतूक संत गतीने सुरू होती.या घटनेची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांना काही नागरिकांनी कळवली.

बातम्या आणखी आहेत...