आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम:महापालिका प्रशासनाने पोलिस अधिक्षकांना मागितला बंदोबस्त

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सोमवार दि. 6 पासून शहराच्या प्रमुख मार्गावर तिसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण मोहिम राबवली जाणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने पोलिस अधिक्षकांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान आता पर्यंत दोन वेळा ही मोहिम राबवुन देखिल रस्त्यावरील अतिक्रमण जैसे-थे असल्याने मोहिम राबविण्याचा घाट कशासाठी? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे.

महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने नोव्हेंबर अखेरीस शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम संपल्या नंतर रस्त्यावरील अतिक्रमण जैसे-थे झाले. त्यानंतर जानेवारी महिन्यात महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम राबविणे सुरुच असताना आता सोमवार पासून तिसऱ्या टप्प्यातील मोहिम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र आता पर्यंत राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमांमध्ये पोलिस बंदोबस्त दिल्या गेला नाही. त्यामुळे ही मोहिम पूर्णपणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला राबवावी लागली. मात्र आता उपायुक्त नील वंजारी यांनी पोलिस अधिक्षकांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. विशेषत: खुले नाट्यगृह ते फतेह चौक ते दिपक चौक. फतेह चौक ते टॉवर चौक ते मदनलाल धिंग्रा चौक, मदनलाल धिंग्रा चौक ते शहर कोतवाली या मार्गावर मोहिम राबविताना प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त पुरविला जातो की अतिक्रमण हटाव पथकाला नेहमी प्रमाणे स्वबळावरच मोहिम राबवावी लागणार? ही बाब सोमवारी स्पष्ट होईल.

हाॅकर्स झोनकडे दुर्लक्ष

यापूर्वीही अनेकदा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली आहे. मात्र मुख्य मार्गावर पुन्हा अतिक्रमण जैसे-थे झाले आहे. हॉकर्स झोन निश्चित केल्या शिवाय अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात काहीही अर्थ नाही. ही बाब स्पष्ट असताना प्रशासनाकडून हॉकर्स झोन निश्चित करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून वारंवार अतिक्रमण हटाव मोहिम राबवून वेळ, श्रम आणि पैसा खर्च केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...