आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎‎:मुख्य मार्गावर आजपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रातील मुख्य‎ मार्गावर सोमवार १३ मार्च पासून धडक‎ अतिक्रमण हटाव मोहीम राबवली‎ जाणार आहे. दरम्यान मुख्य मार्गावर‎ अतिक्रमण धारकांनी केलेले‎ अतिक्रमण काढावे, असे आवाहन‎ प्रशासनाने केले आहे.‎ प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यापासून‎ मुख्य मार्गावरील अतिक्रमणाकडे लक्ष‎ केंद्रित केले आहे. आता पर्यंत तीन‎ मोहिमा राबविल्या असून अद्यापही‎ मोहिम सुरुच आहे.

मात्र आता पुन्हा १३‎ मार्च पासून धडक अतिक्रमण हटाव‎ मोहिम राबविण्यात येत आहे. उत्‍तर‎ झोन अंतर्गत गांधी चौक ते सिटी‎ कोतवाली चौक ते टिळक रोड ते‎ मानेक टॉकीज पर्यंत, माळीपुरा चौक ते‎ मोहता मिल स्‍मशान भुमि ते तपे‎ हनुमान मंदीर पर्यंत तसेच मनकर्णा‎ प्‍लॉट ते तपे हनुमान मंदीर पर्यंत‎ याचसोबत पश्चिम झोन अंतर्गत सिटी‎ कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्‍ला‎ चौक पर्यंत, किल्‍ला चौक ते हरिहरपेठ‎ ते वाशीम बायपास चौक या मार्गावर‎ अतिक्रमण हटाव मोहीम राबवली‎ जाणार आहे. या मार्गावर ज्यांनी‎ रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्या‎ अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण स्वत:‎ काढावे, अन्यथा महापालिका‎ अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने‎ केलेले अतिक्रमण काढण्यात येईल,‎ असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...