आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे इनोव्हेशन इन्स्टिट्यूशन कौन्सिल, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मपरीक्षणात ध्यानाचे महत्व या वर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
भारतीय सेवासदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, उपाध्यक्ष रविकुमार गोयनका, सचवि आलोककुमार गोयनका, प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए. बी. पांडे, प्रमुख वक्ता डॉ. रूपा गुप्ता, डॉ. संजय वीटे, डॉ. अनिल निंबाळकर, स्वेता मेंढे, प्रा. हर्षदा वाधोने, प्रा. किरण शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक स्वेता मेंढे यांनी केले. डॉ. संजय विटे यांनी विद्यार्थिनींना मेडिटेशन यावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ता डॉ. रूपा गुप्ता यांनी कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींना आत्म परीक्षणामध्ये मेडिटेशनचे महत्व व विविध प्रकारच्या मुद्रा शिकवल्या. डॉ. अनिल निंबाळकर यांनीही मेडिटेशन केल्याने स्मरणशक्ती वाढते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन वृशाली भिरड व भावना इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॅडेट पारुल देशपांडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व कॉमर्स विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनी नेहा धनगावकर, स्वीटी वानखडे, स्नेहा पवार, गायत्री मेश्राम, साक्षी बोले, ईश्वरी मांडोगडे यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.