आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पर्यावरणपूरक माझा गणपती उपक्रम

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जठारपेठ परिसरातील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला.

हा उपक्रम शाळेच्या सहशिक्षिका वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ वी ते ७ वी चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या वेळी गणेश मूर्ती सहज व सोप्या पद्धतीने तयार करण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी आकर्षक व मनमोहक गणेश मूर्ती तयार करण्याचे कसब आत्मसात केले व सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या. या वेळी तयार केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना घरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या वेळी बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...