आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र:आधार फाउंडेशनतर्फे पर्यावणपूरक शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग क्रमांक ४ मधील आधार फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात १४३ पाल्यांनी आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना करुन पर्यावरणाचा ऱ्हास वाचवण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र बाजारात मातीच्या मुर्त्यांची विक्री तुलनेने कमी होते. त्यामुळे अनेकांना मातीची मूर्ती मिळत नाही. ही बाब लक्षात घेवूनच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आधार फाऊंडेशनच्या वतीने मोफत देण्यात आले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये प्रभागातील न्यू तापडिया नगर, सातव चौक, दुबे वाडी, पंचशील नगर, खरप आदींसह विविध भागातील स्पर्धक मोठया संख्येने सहभागी झाले होते. स्वतः हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना घरोघरी व्हावी, या उद्देशाने आधार फाऊंडेशनच्या वतीने या मूर्तिपैकी सूंदर मूर्ती बनवून त्यांची आकर्षक सजावट करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाणार आहे.

या कार्यशाळेला अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन स्पर्धकांना तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख प्रमोद देंडवे, महानगर अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे, महासचिव मनोहर बनसोड, प्रा. डॉ. यशवंत जयसिंगपुरे, लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख, अॅड. वंदन कोहाडे, अॅड. अनिल जगताप, डॉ. गायत्री देशमुख, डॉ. मीनल वानखडे, डॉ. विवेक शेगावकर, प्रा. नितीन ढोरे, बंडुभाऊ शेळके, गजानन मालठणकर, राजू लाव्हेरे, राजेश लोलगे यांनी भेट दिली.

शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण सदानंद कोंडे व पराग चव्हाण यांनी दिले. कार्यशाळेचे आयोजन आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष माणीक शेळके यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाऊंडेशनचे राहुल ठाकूर, किशोर ठाकरे, गौरव पांडे, निलेश मंगळे, सुमित ठाकरे, मंगल इंगळे, गोपाल थारकर, सुशील ठाकरे, तेजस पवार, केवल उपाध्ये, महेश गोरे, सूरज कुलथे, संजय वडाळकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...