आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • EPS 95 A Warning Was Given By The Pensioners' Struggle Committee, To Decide On A Pension Increase; Otherwise Movement | Marathi News

आंदोलन:ईपीएस 95 पेन्शनधारक संघर्ष समितीतर्फे देण्यात आला इशारा,पेन्शनवाढीचा निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीची सभा स्वराज्य भवन येथे आयोजित केली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक ११ व १२ मार्चला होणार असून, बैठकीत पेन्शनवाढीचा निर्णय घ्या; अन्यथा भाजप हटाओ देश बचाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष देवराव पाटील हागे यांनी सभेत दिला.

पेन्शन वाढ,महागाई भत्ता देण्याचआश्वासन भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांनी दिले होते. मात्र याचा भाजप सरकारला विसर पडला. या मागण्यांसाठी आंदोलन, निदर्शने, घंटानाद, उपोषण केले. मात्र मागण्या मंजूर झाल्या नाहीत. ६ मार्चला ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीची सभा झाली. त्यात पेन्शनवाढीवर शंकरराव पाटील, श्रीनिवास गणगणे, राजेंद्र भातुलकर, एम.टी. इंगळे, अंबादास भरणे यांनी मनोगत व्यक्त केले. देशातील कामगारांनी एकत्र येऊन २८ व २९ मार्चच्या देशव्यापी बंदमध्ये ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समिती सहभाग घेणार असल्याचेही जाहीर केले. सभेला पी.के. देशमुख, नारायणराव अंधारे, संजीव मालोकार, विवेक पाटील उपस्थित होते. आभार नयन गायकवाड यांनी मानले.

केंद्र सरकारवर टीका
केंद्र सरकारची भूमिका कामगार विरोधी असल्याची टीका देवराव हागे यांनी केला. या धोरणाचा निषेध करीत सरकार हे भांडवलदार धार्जिणे असून, सात वर्षात अनेक उद्योगपतींचे अब्जावधींची कर्जे माफ केली. मात्र कामगार हिताचे कायदे मोडीत काढले असून, सरकारच्या कंपन्या कवडीमोल भावात मर्जीतील लोकांना विकण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...