आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता दिंडी:सामाजिक न्याय दनिानिमित्त आज विविध कार्यक्रमांसह समता दिंडी

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जून रोजी “सामाजिक न्याय दनि” साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रम रविवारी सकाळी आरएलटी विज्ञान महाविद्यालय येथील ऑडिटोरियम हॉलमध्ये हाेणार आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता समता दिंडी काढण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, आमदार डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरणराव सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जि. प. समाज कल्याणचे सभापती आकाश सिरसाट यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, सीईओ सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, समाज कल्याण विभाग अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विजय साळवे आदींची उपस्थिती राहणार आहे.

अशी निघणार दिंडी : समता दिंडीत विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक सहभागी होतील. दिंडीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून प्रारंभ हाेणार आहे. दिंडी सर्वोपचार रुग्णालय, अशोक वाटिका-मदनलाल धिंग्रा चौक (नवीन बस स्थानक) प्रमिलाताई ओक हॉल, पंचायत समिती मार्गाने निघून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सामाजिक न्याय दनिाच्या मुख्य कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान व कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या वेळी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.