आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडाच्या सुचनेला भेलचा ठेंगा:आतापर्यंत सौरऊर्जा प्रकल्पाला सुरूवात नाहीच; 8 महिन्यांपासून मनपाला फटका

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प 30 जुलैच्या आत कोणतेही कारण न सांगता कार्यान्वित करा, या मेडाने दिलेल्या सुचनेला भेल कंपनीने ठेंगा दिला. 30 जुलै नंतरही कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वय झालेच नाही. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. 1400 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी 990 केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला. मेडा ने हे काम भेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे.

प्रकल्पासाठी 6 कोटींचा निधा केला वळता

या प्रकल्पासाठीचा 6 कोटींचा निधी यापूर्वीच वळता केला आहे. तसेच महाऊर्जाकडून मागीतलेला 47 लाख रुपयाच्या अतिरिक्त निधी पैकी 32 लाख 90 हजार रुपयाचा निधी मार्च 2022 ला वळता केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होवून सात महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असताना, हे दोन्ही प्रकल्प सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने मेडाने व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये भेल कंपनीला कोणत्याही परिस्थितीत 30 जुलैपर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने महावितरणे नेट मिटरची टेस्टिंग घेण्याबाबतचे पत्र भेल कंपनीला दिले होते. मात्र 30 जुलै नंतरही प्रकल्पाचे कार्यान्वयन झाले नाही.

मनपाचे महिन्याला 18 लाखांचे नुकसान

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 15 लाखाचे तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्रातील 3 लाख रुपयाचे विद्युत देयकाचा भरणा मनपाला करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...