आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांची माहिती:मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अडचण संपेना; 11 काेटींच्या कामांची माहिती मागवली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही विकास कामांवर हाेत असलेला परिणाम थांबत नसून, आता ब्रेक लावलेल्या १० काेटींच्या विकास कामांची माहिती समाज कल्याण विभागाने पंचायत समित्यांकडून संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. गत दाेन वर्षांपासूनची ही माहिती मागवली आहे. ब्रेक लागलेल्या पाणी पुरवठा, रस्ते, नाली, सामाजिक मंदिराच्या सभागृहांच्या कामांचा समावेश आहे.

मागासवर्गीय घटकाच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक याेजनेअंर्तगत (असुसूचित जाती उपयाेजना- जि. प. समाज कल्याण विभाग) ३४ काेटी २१ लाखांच्या कामांना ब्रेक लागला आहे. शासनाकडून प्रशासकीय कामांना स्थगिती देण्यात आली असून, नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतरच कामांबाबत निर्णय हाेणार आहे. या निधीतून िशष्यवृत्ती, अनुदान, रस्ते, नाली, समाज मंिदरांसह, अनुसूचित जाती घटक वस्ती सुधार योजनेअंतर्गत अन्य कामे प्रस्तावित करण्याची कार्यवाही सुरू हाेती.

काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकार काेसळले आणि शिवसेनेतील एक माेठा गट व भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता या नवीन सरकारकडून पूर्वीच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देण्यात येत आहे. या स्थगितीच्या चक्रातून आता समाज कल्याण विभागही सुटलेला नाही. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (अनुसूचित जाती उपयाेजना) अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, त्यांच्यापर्यंत सर्व सुविधा पाेहाेचवणे, त्यांचा सर्वांगीण विकास हाेणे आदींसाठी निधी मंजूर करून निधी वितरणाचे िनयाेजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियाेजन समितीकडून (डीपीसी) करण्यात येते.

काय आहे आदेशात?
कमांच्या स्थगितीबाबतचा आदेश मुख्य सचिवांनी जारी केला आहे. शासनाच्या विविध विभागांतर्गत १ एप्रिल २०२१ते आतापर्यंत जिल्हा वार्षिक याेजना, राज्यस्तरीय याेजना, आदिवासी उप याेजना, विशेष घटक याेजनेतून निधी मंजूर करण्यात आला. मात्र निविदा न काढलेल्या कामांच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. याबाबतची माहिती सादर करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

अशी आहे माहिती
जि. प.च्या समाज कल्याण विभागाकडे तीन पं. सं.ने माहिती सादर केली.
अकाेट : पंचायत समितीअंतर्गत ३ काेटी रुपयांची ४७ कामे मंजूर झाली. यात रस्ते, वस्ती, नाली, समाज मंदिरांचा समावेश आहे.
बार्शीटाकळी : पंचायत समितीअंतर्गत दाेन ठिकाणच्या पाणी पुरवठ्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ही कामे ५ लाखांची आहेत.
बाळापूर : पंचायत समितीअंतर्गत सर्वाधिक ७२ कामांना मंजुरी प्रदान करण्यात अली. या कामांची किंमत ४ काेटी ५८ लाख आहे. यातून रस्ते, नाली व अन्य कामांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...