आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. राजेंद्र फडके:शकुंतला रेल्वे सुरू करण्यास सर्वतोपरी प्रयत्न; समितीकडून स्थानकाची पाहणी

मूर्तजिापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वे प्रवासी सेवा सुवधिा समितीने सोमवारी, ९ मे रोजी येथील रेल्वे स्थानकावर भेट देऊन प्रवाशांच्या सोई सुवधिांची पाहणी केली. येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या कामांबाबत माहिती घेऊन दिल्ली येथे बैठकीत सर्व रखडलेले कामे, सोयी सुवधिा याबाबत निर्णय घेऊन पूर्ण केले जातील, असे आश्वासन दिले. मूर्तजिापूर-अचलपूर, मूर्तजिापूर-यवतमाळ व पुसद चालणारी ऐतिहासिक शकुंतला रेल्वे सुरू करण्याबाबत रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी शक्य तो पाठपुरावा केला जाईल.

शकुंतला रेल्वे लोहमार्गाकरता १०९७ कोटी राज्य शासनाकडे जमा असून, उर्वरित पैसे राज्य शासनाने दिल्यास शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजचे काम सुरू होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रेल्वे पीएसी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके यांनी दिली. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे पीएससी समितीच्या सदस्या विभाजी अवस्थी रायपूर, कैलास वर्मा मुंबई, रामदास चव्हाण, सेवानविृत्त रेल्वे सीनियर टेक्निशियन पूल विभाग यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांनी येथील तिकीट घर, प्लॅटफॉर्म, पाण्याची व्यवस्था, प्रवाशांकरता प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने लहान शेड उभारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्लॅटफॉर्मवर उपस्थित महिला प्रवाशांकडून समस्या जाणून घेतल्या. या वेळी महिला प्रवाशांनी पाण्याची व्यवस्था व गाड्या विलंबाने येत असल्याचे सांगितले.

पीएससी समितीला शकुंतला बचाव सत्याग्रह समिती, पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने नविेदन देण्यात आले. नविेदनानुसार येथील पादचारी पुलाचे तीन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण करणे, शकुंतला रेल्वेचे काम सुरु करावे, प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाबाबत प्लॅटफॉर्मवर शेड उभारणी करणे, रेल्वे स्थानकावर आजाद हिंद एक्सप्रेस, तिरुपती बालाजी, गितांजली एक्सप्रेस, नागपूर-पूणे, प्रेरणा एक्सप्रेस यासह इतर गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी आमदार पिंपळे, शकुंतला बचाव सत्याग्रह समितीचे वजिय विल्हेकर, दीपक शर्मा दर्यापूर, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, मोहम्मद इब्राहिम अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी राठी, नजिामभाई, पत्रकार प्रा. अवनिाश बेलाडकर, संजय उमक, अजय प्रभे, प्रतिक कुऱ्हेकर, विलास वानखेडे, प्रकाश निरखे, मिलिंद इंगळे, अरविंद तायडे, प्रदीप देशमुख, प्रा. सुरेश वडतकर आदींची उपस्थिती होती. या वेळी स्टेशन अधीक्षक तेजस गवई, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक यादव, रेल्वे पोलसि चौकीचे राजू जळमकर व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...