आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगीकरणाला िवराेध करत भारत मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती माेर्चातर्फे जिल्ह्यात गुरुवारी मोर्चातर्फे ईव्हीएम (इलेक्ट्राॅनिक व्हाेटिंग मशीन) भंडाफोड परिवर्तन यात्रा गुरूवारी जिल्ह्यात दाखल होणार आहे. यात्रेच्या अंतर्गत बाळापूर येथील काॅटन मार्केटमध्ये सभा हाेणार आहे. भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत निघाली होती. मात्र नंतरच्या काळात काेराेनामुळे ही राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा आंध्र प्रदेशापर्यंत जाऊ शकली. आता इव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रा भाग-२ चा प्रारंभ महाराष्ट्रातून झाला आहे.
महाराष्ट्रात २१ फेब्रुवारी २०२३पासून सुरू झालेली यात्रा परिवर्तन १३ मार्च २०२३ पर्यंत चालणार आहे. यात्रा भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय संयोजक, बहुजन क्रांती मोर्चाचे प्रमुख वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे. दरम्यान, बाळापूर येथे ९ मार्च राेजी सभा हाेणार असून, उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे करणार आहेत. कार्यक्रमाला विविध समाजांचे प्रमुख, सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘इव्हीएम’मध्ये घाेळ : सन २००४ च्या नंतर निवडणुकांमध्ये राष्ट्रीय राजकीय पक्षांना बहुजन मिळण्यास प्रारंभ झाला. इव्हीएममध्ये हेराफेरी करत बहुमत प्राप्त करून सरकार स्थापन करण्यात आल्याचा आराेप भारत मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती माेर्चाने केला आहे. ईव्हीएमच्या िवराेधात काँग्रेस-भाजप बाेलण्यास तयार नाही, असेही माेर्चाचे म्हणणे आहे.
सरकारी उद्याेग कवडीमोल भावात विकल्याचा आरोप
देशात काँग्रेस व भाजप सरकारांनी मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केले. आजही खासगीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकारी उद्योग कवडीमोल भावात उद्योगपतींना दिले. मोठ्या प्रमाणात करमाफी देण्यात आली, असा आराेप भारत मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती माेर्चातर्फे करण्यात आला आहे. या खासगीकरणामुळे आरक्षण शून्य झाले असून, एससी, एसटी, आेबीसीचा रोजगार संपला व त्या उपक्रमाच्या फायद्यातून चालणाऱ्या जुनी पेन्शन व सामाजिक योजनाही बंद झाल्या. या खासगीकरणाच्या विरोधात ही परिवर्तन यात्रा आहे, असेही माेर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.