आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Exciting Launch Of Corona Vaccination Campaign For 12 To 14 Year Olds At Barshitakali; In Two Days, 82 Children Received The Corona Vaccine

बार्शीटाकळी:बार्शीटाकळी येथे 12 ते 14 वर्षीय मुलांच्या कोरोना लसीकरण मोहिमेस उत्साहात प्रारंभ; दोन दिवसांत 82 मुलांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

लसीकरण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कोरोना महामारी ओसरत आहे. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाकडून शाळकरी १२ ते १४ वर्षीय मुलांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. बार्शीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयाद्वारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश राठोड यांच्या मार्गदर्शनात लसीकरण मोहित राबवण्यात येत आहे.बार्शीटाकळी शहर व तालुक्यामध्ये सध्या कोरोनाची एकही रुग्ण नाही. तर लसीकरण मोहिम जोरात राबवण्यात येत आहे. बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयामार्फत ३१ मार्च, गुरुवारपासून बार्शीटाकळी शहरात सावित्री बाई फुले विद्यालय आणि १ एप्रिल शुक्रवार रोजी शहरात धाबेकर विद्यालय येथे १२ ते १४ वर्षीय मुलांना कोविड लसीकरण सुरू झाले आहे. दोन दिवसात एकूण ८२ मुलांना लस देण्यात आली, अशी माहिती डॉ. सपना बाठे यांनी दिली.

लसीकरण मोहिमेमध्ये डॉ. महेश राठोड, डॉ. सपना बाठे, डॉ. पंकज इंगोले, डॉ. स्नेहल वानखडे, डॉ. मनिष मेन, ए. एन. एम. ज्योत्स्ना जाधव, ए. एन. एम. दर्शना घावट काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...