आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:वंचित आघाडीची कार्यकारणी जाहीर ; रतन आडे यांची तालुका अध्यक्षपदी निवड

बार्शीटाकळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी नवनिर्वाचित अकोला जिल्हा व जिल्ह्यातील सातही तालुक्यातील कार्यकारणी २६ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात कार्यकरणी जाहिर करण्यात आल्या.

यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात रतन आडे तालुका अध्यक्षपदी तर अजय अराखराव यांची महासचिवपदी, संघटकपदी हरीश रामचवरे, सै. रियासत यांची कोषध्यक्षपदी तर मिलिंद करवते यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाली. यावेळी बार्शीटाकळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाजसेवक अनिल धुरंधर, प. स. सदस्य दादाराव पवार, बार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष अॅड. राहुल जामनिक, अजहर पठाण, रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, तालुका निरीक्षक श्रीकृष्णा देवकुणबी, सनी धुरंधर, रक्षक जाधव, राजेंद्र दाईसकर, भूषण खंडारे, प्रवीण वानखडे, मोहोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...