आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हकालपट्टी:सुषमा अंधारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून ४५ आमदार गेले; पण पक्षाला फरक पडला नाही आपली मशाल पेटतच आहे. मात्र महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मी शिवसेनेलाच मतदान करत आलो आहे, हे सांगायलाही गणेश महाराज शेटे विसरले नाहीत.

शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी देवीदेवतांबद्दल केलेल्या वक्तव्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. त्यावर वारकरी संप्रदायाने आक्षेप घेतले आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना गणेश महाराज शेटे म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी लोकांची दिशाभूल करायचा व्यवसाय बंद करावा. आपण उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याबद्दल व आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल वारकऱ्यांचा भावनेचा विचार करून त्यांची हकालपट्टी करावी. अन्यथा उद्यापासून महाराष्ट्रातील वारकरी संघटना गावोगावी निदर्शने करणार आहे.

आमचे कीर्तनकार कीर्तनाच्या शेवटच्या दोन मिनिटांमध्ये सर्व श्रोत्यांजवळून एक शपथ घेतील की, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांचा व संत तुकाराम महाराजांचा वारसा माझा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा माझा आहे. या वारसाने चालत असताना ज्या पक्षात सुषमा अंधारे राहील मी त्या पक्षाला मतदान करणार नाही’. इतकेच नव्हे तर प्रत्येक वारकरी, माळकरी प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देतील व सुषमा अंधारे यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी करतील. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...