आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:विठ्ठलाच्या सगुण रुपामध्ये सर्व सुखाची अनुभूती : विष्णू महाराज

अकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीक्षेत्र कालवाडी येथील संत तुकाराम महाराज बीज महोत्सव

‘संतश्रेष्ठ तुकोबाराय हे पंढरपूर नविासी विठ्ठलाचे भक्त होते. विठ्ठलरुप हा त्यांच्या नित्य आवडीचा विषय होता. या रुपाचे त्यांनी सुंदर वर्णन केले आहे. विठ्ठलाच्या सगुण रुपात सर्व सुखाची अनुभूती मिळते. त्यासाठी तुकोबा सारखी निष्काम भक्ती करा,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध मृदंगाचार्य व कीर्तनकार ह.भ.प.विष्णू महाराज गावंडे यांनी केले.

विदर्भाचे देहू म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कालवाडी येथील संत तुकाराम बीज महोत्सवातील कीर्तनात विष्णू महाराज बोलत होते. ‘सुंदर ते ध्यान। उभे विटेवरी’ या श्री विठ्ठलाच्या रुपाचे सुंदर वर्णन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचे अभंगाचा भावार्थ सांगताना ते बोलत होते. शुद्ध अंतकरणाने भक्ती केल्यास ईश्वर दर्शन घडते. त्यासाठी संत सहवास हवा. संतजनाच्या सहवासातच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो, असे ते म्हणाले. प्रारंभी ह.भ.प. वै.पंजाबराव हिंगणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी भावांजली वाहली. कीर्तनात भाविकभक्त व गावकरी उपस्थित होते.

जेथे आहेत संत, तेथे भेटती भगवंत : अंतकरणाच्या शुद्धतेने भगवंताचे नामस्मरण हाच भगवंत प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भगवंत हा संतांचे सहवासात भेटतो. जेथे आहेत संत तेथे भेटती भगवंत आणि म्हणून आपला तो एक देव करुन घ्यावा. संसारातूनही परमार्थ साधता येतो, असे चिंतन ह.भ.प. मोहन महाराज रेळे यांनी मांडले. संसारातून परमार्थ करता येतो आणि परमार्थातून संसार. भक्ती ही मनोभावे असली पाहीजे. आपणास दु:खात देव तो आठवतो. सुखात मात्र आपण देवाला विसरतो. विठ्ठल भक्तीत दु:ख दूर पळून जाते, उरते तेवढे सुख. त्यासाठी सदगुरुची भेट व सहवास हा मिळावा लागतो. त्यासाठी भगवंताची भक्ती करावी, असे मोहन महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...