आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात मुदतबाह्य अग्निरोधक सिलिंडर!:डिसेंबर 2021 मध्येच संपली मुदत, आगीचा घटना घडल्यास जबाबदार कोण?

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांची सतत लगबग असलेल्या महापालिका मुख्य कार्यालयात मुदतबाह्य अग्निरोधक सिलिंडर कार्यरत ठेवण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ मध्येच या सिलिंडर मध्ये केमीकल पावडर नव्याने भरणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महापालिका कार्यालयात आग लागल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे विविध कामासाठी नागरिकांची मोठी गर्दी महापालिकेत असते. त्यामुळेच आग लागल्यास अग्निशमन विभागाचे बंब येई पर्यंत प्राथमिक उपचार म्हणून महापालिका कार्यालयात अग्निरोधक यंत्र (सिलिंडर) ठेवण्यात आले आहेत. या सिलिंडर मध्ये प्रेशर (हवा) आणि केमीकल युक्त पावडर असते. आग लागल्यास काही प्रमाणात तिला आटोक्यात आणण्यासाठी या सिलिंडरचा उपयोग होतो. यात भरलेली हवा आणि केमीकल युक्त पावडर एक वर्षा नंतर बदलावी लागते. महापालिकेत जानेवारी २०२० मध्ये १७ सिलिंडर लावण्यात आले होते.

डिसेंबर २०२१ मध्ये यातील हवा आणि केमीकल बदलणे गरजेचे होते. विशेष म्हणजे सिलिंडर केव्हा बदलावे? याबाबतची माहिती सिलिंडरवरच दिलेली असते. असे असतानाही डिसेंबर २०२२ लोटून आणि जानेवारी २०२३ सुरु झाले असताना हे सिलिंडर जैसे-थे आहेत. मागील एक वर्षापासून याकडे अग्निशमन विभागाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण अशी अवस्था महापालिकेची झालेली आहे.

अन्य ठिकाणीही तीच गत

महापालिकेचे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे चार झोन कार्यालये आहेत. या कार्यालयातही नागरिक कराचा भरणा तसेच तक्रारी घेवून येतात. तसेच कस्तुरबा गांधी महिला रुग्णालय, किसनीबाई भरतीया रुग्णालय, अशोक नगर रुग्णालय असे तीन रुग्णालये आहेत. या रुग्णालयातही रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी देखील मुदतबाह्य अग्रिरोधक सिलिंडर आहेत. त्याच बरोबर अनेक शाळांमध्ये अग्रिरोधक सिलिंडर लावलेले नाहीत.

अग्रिप्रतिबंधक उपाय योजना नाहीत

महापालिका मुख्य कार्यालय तीन मजली आहे. मुख्य कार्यालयात अग्रिरोधक सिलिंडर मुदतबाह्य झाले आहे त्याच बरोबर महापालिकेत अन्य इमारती मध्ये राबविली जाणारी अग्रिनप्रतिबंधक उपाय योजना कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे महापालिकेने स्वत:च अग्रिप्रतिबंधक उपाय योजना राबविण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...