आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन:गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुंठेवारी प्लॉटचे नियमानुकुलचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १५ दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ज्या नागरिकांकडे गुंठेवारीचे प्लॉट आहेत अथवा गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉटवर बांधकाम केलेले आहे, अशा नागरिकांनी आपले प्रस्ताव नगररचना विभागात सादर करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम १२ मार्च, २०२१ अन्वये अकोला महापालिका क्षेत्रांतर्गत गुंठेवारी भूखंड, इमारत नियमानुकूल करण्याबाबत ऑनलाइन पद्धतीने मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली होती. मात्र या प्रणालीत काही तांत्रिक कारणास्तव मंजुरी प्रदान करण्यास विलंब होत असल्याचे तसेच नागरिकांना अकारण त्रास होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये नागरिकांना अधिक सोईचे व्हावे, यासाठी विशिष्ट कालावधीकरिता ऑफलाइन पद्धतीने गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निश्चित केले होते. त्याची मुदत १० नोव्हेंबरला संपुष्टात आली. मात्र गुंठेवारीचे नियमानुकुलसाठीचे दाखल झालेले प्रस्ताव व मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या विनंतीवरून गुंठेवारी नियमाकुलचे प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारण्यासाठी‎ महानगरपालिकेच्या आयुक्त तथा ‎ ‎ प्रशासक कविता द्विवेदी यांनी १५ ‎दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

त्यामुळे गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉट धारकांना शुक्रवार, २५‎ नोव्हेंबरपर्यंत नियमानुकुलचे‎ प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने‎ दाखल करता येणार आहेत. ‎ ‎ नागरिकांनी गुंठेवारीचे‎ नियमानुकुलचे ऑफलाइन प्रस्ताव ‎कार्यालयीन दिवशी अकोला ‎महापालिका सहायक संचालक,‎ नगर रचना, यांच्या कार्यालयात‎ तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालय येथे‎ संपूर्ण आवश्यक कागदपत्रासह‎ दाखल करावे, असे आवाहन‎ प्रशासनाने केले आहे. २५‎ ‎नोव्हेंबरनंतर आलेले प्रस्ताव हे‎ आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले‎ जातील, याची नोंद नागरिकांनी‎ घ्यावी, असेही महापालिका‎ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे‎ गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव‎ किती येतात हे पाहणे औत्सुक्याचे‎ ठरेल.‎

या कागदपत्रांची आवश्यकता‎ विहित नमुन्यात अर्ज, ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे खरेदी खत, नमुना ड, गाव‎ नमुना सात, अभियंता यांनी प्रमाणित केलेला मोजणी नकाशा, खासगी‎ रेखांकन नकाशाची छायांकित प्रत, क्षतिपूर्ती बंधपत्र लेझर पेपरवर, प्रतिज्ञा‎ पत्र (१०० रु. स्टॅम्प पेपर), स्वयंघोषित प्रमाणपत्र, चालू वर्षाचा मोकळ्या‎ जागेचा, इमारतीचा कर भरल्याची पावती, आधार कार्ड, गुगल मॅप,‎ बांधकाम असल्यास स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र‎ (आवश्यकतेनुसार), वीज बिल छायाप्रत, वास्तूविशारद, अभियंता,‎ आरेखक यांचेकडील गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमावलीनुसार‎ नकाशा ३ प्रती (अभियंता व अर्जदार यांचे स्वाक्षरीसह) आदी कागदपत्रे‎ गुंठेवारीचे नियमानुकूल प्रस्तावासोबत जोडावेत.‎

बातम्या आणखी आहेत...