आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गुंठेवारी प्लॉटचे नियमानुकुलचे प्रस्ताव ऑफ लाईन पद्धतीने सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 15 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ज्या नागरिकांकडे गुंठेवारीचे प्लॉट आहेत अथवा गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉटवर बांधकाम केलेले आहे, अशा नागरिकांनी आपले प्रस्ताव नगररचना विभागात सादर करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001 यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम दिनांक 12 मार्च, 2021 अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत गुंठेवारी भुखंड, इमारत नियमानुकूल करण्याबाबत ऑनलाईन पध्दतीने मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. मात्र या प्रणालीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव मंजूरी प्रदान करण्यास विलंब होत असल्याचे तसेच नागरीकांना अकारण त्रास होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्या नंतर आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये नागरिकांना अधिक सोईचे व्हावे यासाठी विशिष्ट कालावधी करिता ऑफलाईन पध्दतीने गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव स्विकारण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्याची मुदत 10 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र गुंठेवारीचे नियमानुकुलसाठीचे दाखल झालेले प्रस्ताव व मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून तसेच नागरिकांच्या विनंती वरुन गुंठेवारी नियमाकुलचे प्रस्ताव ऑफलाईन स्विकारण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी १५ दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉट धारकांना 25 नोव्हेंबर पर्यत नियमानुकुलचे प्रस्ताव ऑफ लाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. नागरिकांनी गुंठेवारीचे नियमानुकुलचे ऑफलाईन प्रस्ताव कार्यालयीन दिवशी अकोला महानगरपालिका सहाय्यक संचालक, नगर रचना, यांचे कार्यालयात तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालय येथे संपुर्ण आवश्यक कागदपत्रास दाखल करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 25 नोव्हेंबर नंतर आलेले प्रस्ताव हे आॅनलाईन पद्धतीने स्विकारले जातील, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
--------------
या कागदपत्रांची आवश्यकत
विहित नमुन्यात अर्ज, ३१ डिसेंेबर २०२० पूर्वीचे खरेदी खत, नमुना ड,गांव नमुना सात, अभियंता यांनी प्रमाणीत केलेला मोजणी नकाशा, खासगी रेखांकन नकाशाची छायांकित प्रत, क्षतीपुर्ती बंधपत्र (Indemnity Bond Affidavit) लेजर पेपरवर, प्रतिज्ञा पत्र (१०० रू. स्टॅम्प पेपर Affidavit), स्वयंघोषीत प्रमाणपत्र, चालू वर्षाचा मोकळ्या जागेचा, इमारतीचा कर भरल्याची पावती, आधार कार्ड, गुगल मॅप, बांधकाम असल्यास स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), विज बिल छायाप्रत, वास्तूविशारद,अभियंता,आरेखक यांचेकडील गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमावलीनुसार नकाशा ३ प्रती (अभियंता व अर्जदार यांचे स्वाक्षरीसह) आदी कागदपत्रे गुंठेवारीचे नियमानुकुल प्रस्तावा सोबत जोडावेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.