आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या व मुद्दे:दैनिक दिव्य मराठीतर्फे रविवारी रूबरू कार्यक्रम

अकोला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख समस्या व मुद्द्यांबाबत अकोलेकरांचा आवाज म्हणून दैनिक दिव्य मराठीने एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून नेहमीच प्रभावीपणे विषय मांडले आहेत. हेच सामाजिक भान जपत पुन्हा एकदा शहरातील याच प्रमुख मुद्द्यांवर शहरातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ च्या वतीने रविवारी ७ ऑगस्ट रोजी ‘रूबरू’ गोष्ट तुमची अन् तुमच्या प्रभागाची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात ‘दिव्य मराठी’ ची चमू तुमच्या प्रभागात येवून परिसरातील समस्या थेट तुमच्या कडून जाणून घेणार आहे. इतकेच नव्हे तर मनपाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या समोर समस्या मांडून त्याचे निराकरण करण्यासाठीही पाठपुरावा करणार आहे. रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रभाग क्रमांक २९ मधील बलोदे-लेआऊट, बाजोरीया नगरी, आरोग्य नगर, उन्नती नगर, लहरिया नगर, बंजारा नगर, आनंद नगर, ख्रिश्चन कॉलनी, हिंगणा रोड या भागातील नागरिकांसाठी श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृह, बलोदे ले-आऊट

बातम्या आणखी आहेत...