आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा टिसी स्वत:च्या मर्जीनुसार वितरीत करतात. मात्र, या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 'हँड हेल्ड टर्मिनल' उपकरण पर्यवेक्षकांना आले आहे. यामुळे चार्ट तयार झाल्यानंतर राहणाऱ्या रिक्त जागा ऑनलाईनद्वारे वेंटिंगच्या प्रवाशांकडे ऑटोमॅटिक वळत्या होणार आहे. भुसावळ मंडळामध्ये ही सुविधा अकोल्यावरून जाणाऱ्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे एचएचटी उपकरण?
तिकीट पर्यवेक्षकांना दिलेले हे हँड हेल्ड टर्मिनल सेंटल रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम (क्रीस) शी जोडलेले राहणार आहे. त्यामुळे धावत्या रेल्वे गाडीत एकूण किती बर्थ रिकामे आहेत, याची माहिती कळू शकणार आहे. यामुळे आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना बर्थ मिळणार आहे. धावत्या रेल्वे गाडीतून रिकामे बर्थ असल्याची माहिती पुढील रेल्वे स्थानकावर पाठविण्याची उपकरणामध्ये सुविधा आहे.
पुढच्या स्टेशनवर मिळेल जागा
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जर एखादी व्यक्ति बोर्डिंग स्टेशनवरील पुढील स्टेशनपर्यंत पोहचले नाही. तर ही जागा रिक्त मानल्या जातो. अशावेळी ही जागा वेटिंगमध्ये असलेल्या अन्य प्रवाशांला देण्यात येते. यापूर्वी चार्ट तयार झाल्यानंतर गाडीत रिकाम्या असलेल्या बर्थची माहिती केवळ टिसींनाच असायची. यामुळे जागा देण्याबाबत टिसीची मनमानी चालायची. नवीन प्रणालीमुळे यावर चाप बसणार आहे. आरएसीच्या प्रवाशांना नियमाप्रमाणे बर्थ उपलब्ध होणार आहे.
भुसावळ मंडळामध्येही सुविधा उपलब्ध
हँड हेल्ड टर्मिनल हे जुलै महिन्यापासून देशातील महत्वाच्या गाड्यांमधील पर्यवेक्षकांना देण्यात आले. आता भुसावळ विभागातील गाड्यांनाही ही सुविधा देण्यात आली आहे. अमरावती-मुंबईमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली असून, पुढेही काही गाड्या याअतर्गंत येणार आहे. यामुळे विदर्भातील प्रवाशांना मोठ्या दिलासा मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.