आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात अमरावती येथील श्रीकांत भारतीय यांच्या नावाचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांना डिवचण्याचे काम जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस करताहेत. आमदार आमोल मिटकरी यांनी आरोप केला की, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कसे हुकुमशाहा आहेत हे यावरून सिद्ध होते. त्यांनी राज्यातील ओबीसी समाजातील, मराठा समाजातील नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक डावलले आहे. त्यांना राज्यसभा तसेच विधान परिषदेवरसुद्धा संधी दिलेली नाही. ते जाणीवपूर्वक सर्वसामान्यांना डावलण्याचे प्रयत्न करतात का, हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी जीवाचे रान केले, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक राज्यसभा आणि विधान परिषदेचा त्यांचा पत्ता कट केला, हे षडयंत्र आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले माजी स्वीय सहायक अभिमन्यू पवार आणि श्रीकांत भारतीय या दोघांनाही अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद दिली आहे. महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांना तर कशातच ठेवले नाही. केशव उपाध्ये यांना तर भजन म्हणण्यासाठी तेवढे शिल्लक ठेवले आहे, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.