आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:श्री शिवाजी महाविद्यालयात निरोप समारंभ

अकोट15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर दादाराव बेलसरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील पांडे होते तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. संजय वाघ, कला शाखा प्रमुख डॉ. विलास तायडे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. रवी जुमळे, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. गजानन वानखडे, ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय भगत होते. दादाराव बेलसरे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात ३३ वर्ष सेवा केली. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप व सत्काराचा कार्यक्रम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी डॉ. संजय वाघ, डॉ. विलास तायडे, डॉ. माधुरी देशमुख, किशोर लादे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय भगत, सूत्रसंचालन प्रा.‌ स्नेहल रोडगे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कळवली आहे.

बातम्या आणखी आहेत...