आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतरस्ता, पांदणरस्ता व वहिवाट रस्ता कार्यशाळा‎

बार्शीटाकळी‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी‎ तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत‎ असलेल्या शेतरस्ता, पांदणरस्ता व‎ वहिवाट रस्त्यांच्या समस्येवर‎ अभयसिंह मोहीते उपविभागिय‎ अधिकारी मुर्तिजापुर यांच्या वतीने‎ शेती रस्त्यांच्या विविध समस्यांवर ५‎ जानेवारी, गुरुवार रोजी,‎ बार्शीटाकळी येथील पंचायत‎ समितीच्या स्व. वसंतराव नाईक‎ सभागृहात मार्गदर्शन करण्यात‎ आले.‎ या कार्यशाळेचे मार्गदर्शक‎ अभयसिंह मोहिते, तर प्रमुख‎ उपस्थितीमध्ये गजानन हामंद,‎ तहसीलदार बार्शीटाकळी होते.‎ चुकीच्या अर्ज करण्याच्या‎ पद्धतीमुळे वर्षानुवर्षे अर्जदाराला‎‎‎‎‎‎‎‎‎ न्याय मिळत नाही. प्रसंगी त्याच्या‎ विरुद्ध निकाल जाण्याची दाट‎ शक्यता असते.

अशावेळी‎ मामलेदार कायदा १९०६ नुसार‎ वहिवाटीचा अडवलेला रस्ता‎ मोकळा करून देण्याची कारवाई‎ करण्यात येते तर कलम १४३ नुसार‎ शेतकर्‍याला सोयीस्कर व‎ जवळपासचा नविन रस्ता देण्याची‎ कारवाई करण्यात येते, त्यानुसार‎ आवश्यक असलेल्या रस्त्याची‎‎‎‎‎‎‎‎‎ मागणी केल्यास कमीतकमी वेळेत‎ न्याय मिळू शकतो. परंतु, अनेक‎ शेतकरी चुकीच्या पद्धतीने‎ कार्यालयात अर्ज सादर करतात.‎ त्यांना वर्षानुवर्षे न्याय मिळण्यास‎ विलंब होतो. तर काही प्रकरणे‎ न्यायालयात सुरु असल्याने त्या‎ प्रकरणामध्ये हस्ताक्षेप करता येत‎ नाही, असे मार्गदर्शनात मान्यवरांनी‎ सांगितले.

कार्यक्रमात बार्शीटाकळी,‎ मुर्तिजापूर व बाळापुर तालुक्यातील‎ शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.‎ यावेळी प्राप्त समस्या निकाली‎ काढण्याबद्दल तहसीलदार यांना‎ निर्देश देण्यात आले. यावेळी‎ तालुक्यातील चारशे ते पाचशे‎ शेतकऱ्यासह इतर दोन तालुक्यातील‎ शेतकरी उपस्थित होते. तसेच‎ तहसिल कार्यालयातील नायब‎ तहसीलदार हर्षदा काकड, ना.‎ तहसीलदार महसुल आर . बी‎ डाबेराव, ना. तहसिलदार शिवहरी‎ थोंबे, तालुक्यातील सहा मंडळाचे‎ मंडळ अधिकारी, तलाठी व इतर‎ विभागाचे कर्मचारी सुद्धा हजर होते.‎ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी‎ बार्शीटाकळी तालुका पत्रकार‎ संघाच्या श्याम ठक, संजय वाट,‎ राहुल राऊत व इतर सदस्यांनी‎ अथक परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...