आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा निर्धार; साथीने लढू; पण आत्महत्या नाही करणार

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या निश्चयाला अकाेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून साथ मिळत आहे. बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकऱ्यांनी पाेळ्याच्या दिवशी आम्ही एकमेकांना साथ देऊन लढणार मात्र, आत्महत्या करणार नाही, अशी शपथ घेतली.

कधी अतिवृष्टी तर कधी अनियमित पाऊस; विविध राेगांचे आक्रमपणासह अन्य कारणांमुळे शेतमालाचे उत्पादन घटत आहे. परिणामी मशागत व पेरणीसाठीचा खर्चही प्राप्त हाेणाऱ्या उत्पन्नातून भागत नाही.

समस्या सुटाव्यात
नापिकी, घटलेले उत्पादन, पिकांवरील रोगराई, वाढता उत्पादन खर्च, कर्जामुळे शेतकरी हवालदिल झाले. गावात रस्त्यांचीही समस्या आहे. अन्य ठिकाणचे पाणीही शेतशिवारात जमा हाेते. मात्र शेतकऱ्यांनी संकंटाशी सामना करावा, हिंमत हरु नये. शेतकरी आत्महत्या रोखण्याची शपथ पोळ्याच्या दिवशी अंदुरा येथे घेतली.
संजय घंगाळे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...