आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी संवाद:शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवलंबवावे : डॉ. कांतप्पा खोत

मूर्तिजापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व आपल्या उत्पादनामध्ये वृद्धी कशी होईल, याबाबीकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे, सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासून घरच्या बियाण्याचाच वापर करावा, असे मार्गदर्शन व आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ कांतप्पा खोत यांनी शेतकऱ्यांना केले.

तालुक्यातील अनभोरा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ कांताप्पा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र आयोजित केल होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे, डॉ. घाटोळ यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी सुहास बेंडे, आत्माचे संदीप गवई, कृषी सहाय्यक तात्यासो गडदे, समुह सहाय्यक प्रतीक बढे, कंपनीचे प्रतिनिधी अतुल गोडसे, कृषी मित्र स्वप्नील गणेशपुरे व जिल्ह्यातील व तालूका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, तथा परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.