आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील माना फाट्यावर उमा नदीच्या पुलाजवळ ट्रेलर व कंटेनरचा भीषण अपघात होऊन कंटेनर चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली असून, यात ट्रेलर मधील १ जण जखमी झाला आहे. या संदर्भात प्राप्त माहितीवरून अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारा कंटेनर क्र. डी.डी.०३ पी.९७४४ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अमरावतीकडून अकोल्याकडे लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रेलर क्र.आर जे ४७ जि ए २६४१ ला समोरुन जबर धडक दिली.
यात कंटेनरचा टायर फुटून दोन्ही वाहन अनियंत्रित होऊन रोडवरून अंदाजे १५ ते २० फूट खाली उलटले यात कंटेनर डी.डी.०३ पी.९७४४ चा चालक नौशाद अहमद शेख वय ५० वर्ष हा कंटेनर खाली दबल्याने जागीच ठार झाला असून, ट्रेलर क्र.आर जे ४७ जि ए २६४१ त्रिपाल सिंग हा जखमी झाला. या घटनेची माहिती माना पो.स्टे.ठाणेदार कैलास भगत यांना मिळताच त्यांनी ना.पो. कॉ.नंदकिशोर टिकार,ना.पो.कॉ. संदीप सरोदे, पो.कॉ.उमेश हरमकर, जयकुमार मंडावरे, रमाकांत वाघमारे, सुशील आठवले या सहकाऱ्यांना घेऊन त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातातील मृत व जखमीस बाहेर काढून प्रा.आ.केंद्र आपत्कालीन पथकाचे स्वप्नील चौधरी, गौतम निंडोरे, रितेश चिनाप्पा यांच्या सहकार्याने जखमीस उपचारासाठी व मृतक नौशाद अहमद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे रवाना केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.