आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधीच विकलेली शेती दुसऱ्यांदा विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कृष्णगर धनराज तायडे व राजेश वामनराव गिरी अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांवर व्हीएचबी कॉलनी मलकापूर येथील गजानन केशवराव छबीले यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गजानन छबीले यांच्या शेजारी कृष्णगर तायडे व राजेश गिरी राहतो. २०१८ मध्ये छबीले यांना शेती विकत घ्यायची होती.
ऑक्टोबर २०१८ मध्ये राजेश गिरी छबीले यांना भेटला व कृष्णागर यांना त्यांची कुरणखेड जवळील शेती विकायची आहे असे सांगितले. एक लाख ७५ हजार रुपये एकर भावाने शेतीचा सौदा झाला. त्यानंतर टोकन म्हणून छबीले यांनी कृष्णागर यास २० हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम खरेदी खत ज्या दिवशी केल्या जाईल त्या दिवशी देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णागर यास ३ लाख ३० हजार रुपये दिले. त्यानंतर डाबकी कुरणखेड मंडळ येथील गट क्रमांक १४/४ एकूण क्षेत्रफळ १ हेक्टर ५३ आर पैकी ० हेक्टर ८४ आर एवढ्या शेतीची खरेदी खत नोंदवून दिले व राजेश गिरी याने खरेदी खतावर आधीच विकलेल्या शेतीचे दुसऱ्याला दिले खरेदी खत साक्षीदार म्हणून केली होती व तलाठी कार्यालयात नोंद करण्याची जबाबदारी घेतली होती.
त्यानंतर छबीले यांना शेतीचा ताबा देण्यात आला. छबीले यांनी वारंवार राजेश गिरी याला सातबारा मध्ये नोंदणी का झाली नाही याबाबत विचारणा केली असता तो वेगवेगळी कारणे देत होता. फेब्रुवारी २०२१मध्ये छबीले यांच्या घरी एक व्यक्ती आला व त्याने सांगितले की सदर दोन एकर शेती ही पळसपगार यांनी घेतली आहे व त्यांच्या नावावर नोंद सुद्धा आहे. त्यानंतर छबीले यांनी गिरी व कृष्णागर यास विचारणा केली असता त्यांनी २०१७मध्ये रेखा मोहड यांना शेती विकली होती असे सांगितले. त्यानंतर सविस्तर चौकशी केली असता रेखा मोहोड यांनीसुद्धा ती शेती रितसर पळसपगार यांना विकल्याचे समोर आले. या प्रकरणी छबीले यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी कृष्णगर धनराज तायडे व राजेश वामनराव गिरी या दोघां आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.