आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीचा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच:भानस तांड्यावर उत्सव परंपरा अन् लोक संस्कृतीचा उस्तव

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंजारा समाजासाठी होळीचा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. सध्या विविध तांड्यांवर पारंपारिक वेशभुषा आणि लोकगीतांमुळे होळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या भानस तांड्यावरही परंपरा आणि लोकसंस्कृतीच्या होळी उत्सवाला रंग चढला आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला, लोकगीतांची साथ आणि उत्साह तांड्यावर पाहायला मिळतोय.

गेरीया जमवतात लाकडे : होळीच्या दुसऱ्या दविशी बंजारा समाजाची होळी साजरी होते. ही होळी पहाटेच्या वेळी पेटवली जाते. ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहे अशी उपवर मुले होळीसाठी लाकडं जमा करतात. त्यांना गेरीया असे म्हणतात.

महिनाभर उत्सव : बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो. दांडी पौर्णिमेपासून होळीला सुरुवात होते. बंजारा लोकगीतांनी या उत्सवाची चाहूल लागते. होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. लेंगीगीतांच्या ठेक्यावर नाचणारे आबालवृद्ध येथे लक्ष वेधून घेतात.

फाग किंवा फगवा : लेंगी गीतांमध्ये बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणारी गीते आहेत. वात्रटिकाही यात असते. बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा, धुंड अशा विविध परंपरा जोपासल्या जातात. रंगपंचमीला तर तांडा आनंदात हरवलेला असतो. महिला यादविशी लोकगीते गात फाग किंवा फगवा मागतात. होळीचा सण साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने घेतलेले पैसे म्हणजे फाग किंवा फगवा.

बातम्या आणखी आहेत...