आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. एक्सप्रेस गाड्यांना पंधरा दिवसांचे वेटिंग आहे. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार दरम्यान विशेष शुल्कासह २ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
०८१०१ समर स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १८ जून रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ११.३५ वाजता शालिमार येथे पोहोचेल. ०८१०२ समर स्पेशल शालिमार येथून १४ जून २०२२ रोजी १५.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी गुरुवारी ०४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. दोन द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय श्रेणी वातानुकूलित, ८ शयनयान आणि २ द्वितीय आसन श्रेणीसह ब्रेकव्हॅन अशी गाडीची संरचना आहे. २९ जूनपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे.
त्यानंतर पुढे गाडी नियमित होणार आहे. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव (फक्त ०८८१०१ साठी), बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी, नागपूर असे गाडीचे थांबे आहेत. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देता येईल. विशेष गाडी क्रमांक ०८१०१ चे बुकिंग विशेष शुल्कासह १५ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.