आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित आघाडी:शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वंचित आघाडीकडून लढा

बार्शीटाकळी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गरजू शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे बँकेतून मिळण्यास अडचणी येत होत्या. त्याचा वंचितने पाठपुरावा केला. यामुळे गरजूला आर्थिक प्रदान झाली. तालुक्यातील भेडगाव येथील मिलिंद भगत व अनिता भगत यांचे पीएम किसान योजनेचे चार हजार मंजूर झाले होते. मात्र, ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता बँक मॅनेजरने पैसे देण्यास मनाई केली. त्यांच्यावर आधी शेतीचे कर्ज असल्यामुळे पैसे देऊ शकत नाही, असे मॅनेजरने सांगितले. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून लाभार्थी बँकेत चकरा मारत होते.

पिडीत वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांच्याशी संपर्कात आले. यानंतर वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी २८ जुलै रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंजर येथे जाऊन बँक मॅनेजरशी संपर्क साधला. त्यांना याबाबत विचारणा केली. पीएम किसान योजनेचे पैसे न देण्याबाबत लेखी उत्तर मागीतले. किसान योजनेचे पैसे लाभार्थींना देण्याचे बार्शीटाकळी तहसीलदार गजानन हामद यांचे बँकांना आदेश आहे. तसे पत्र दाखविण्यात आले. यावेळी बँक मॅनेजर यांनी अनिता भगत यांना चार हजार रुपये दिले.

याबद्दल खातेदारांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, अक्षय राठोड, उज्वला गंडलीग, सरपंच सुनीता भगत, मिलिंद करवते, श्रीकृष्ण देवकुणबी, बाळू गंडलीग, भूषण खंडारे, जनार्दन खील्‍लारे, हरीश रामचवरे, शिलवंत ढोले, सनी धुरंधर, सतिश इंगळे, शुध्दधन करवते, रक्षक जाधव, भूषण सरकटे, विशाल तायडे, आकाश सावळे, सतीश गालट, संदिप सराठे, निलेश इंगळे, निरंजन लठाड यांनी सहकार्य केले. यावेळी लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुका कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन तालुका अध्यक्ष अमोल जामनिक यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...