आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Fight For The Treatment Of A Deaf Daughter Of A Cancer stricken Mother; Persistence To Give A Normal Life To A Crippled Girl |marathi News

मातृदिन विशेष:कॅन्सरग्रस्त आईचा कर्णबधीर मुलीच्या उपचारासाठी लढा; दिव्यांग मुलीला सर्वसामान्य आयुष्य देण्याची जिद्द

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई म्हणजे यातना, सहनशीलता, समर्पण, बरेच काही. काम असो वा अडचण आपण आईला हाक मारतो. आईही कितीही कष्टात असली, तरी प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला तयार असते. याचे उदाहरण म्हणजे शारदा माळी. त्या कॅन्सरग्रस्त आहेत. मात्र, त्यांची दिव्यांग मुलगी कृष्णालीच्या उपचारासाठी धडपड व चिकाटी आईच्या नात्याचा श्रेष्ठत्व प्राप्त करून देते.

उरळ येथील शारदा प्रशांत माळी कुटूंब अल्पभूधारक आहे. शेती, शेमतजूरी करून पोट भरतात. २०१३ मध्ये शारदा यांना कृष्णाली झाली. तीन महिन्यानंतर कृष्णाली कर्णबधीर असल्याचे त्यांना कळले. या वेळी परिस्थिती नसतानाही मुलींच्या आजारावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. काही करून आपल्या मुलीला ऐकू यावे, असा त्यांचा अट्टहास होता. अनेक संघर्षपूर्ण प्रवासानंतर तीन वर्षाच्या कृष्णालीवर शस्त्रक्रिया झाली. तिला सौम्य ऐकू येऊ लागले. तरी संपूर्ण उपचारासाठी तिला अकोला येथील जठारपेठ परिसरातील एकवीरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या बालविकास केंद्राच्या कर्णबधीर मुलांच्या शाळेत घालण्यात आले. सर्व व्यवस्थित सुरू असताना २०२० एप्रिलमध्ये कोरोना काळात शारदा माळी यांना दुर्धर आजाराचे निदान झाले.

तिसऱ्यास्तरामध्ये कर्करोग पोहोचला होता. या वेळी कृष्णालीचे शिक्षण की, कर्करोगावर उपचार असा प्रश्न कुटुंबापुढे आला. पण कृष्णालीच्या आईने मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. शासकीय योजनेतून त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. त्यांच्यावर शेवटच्या टप्प्यातील उपचार सुरू आहे. मात्र, दरम्यान मुलीच्या शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. दिव्यांग मुलांना ऑनलाइन शिक्षण शक्य नाही. कोरोना काळात त्या खासगी गाडीने तिला शाळेत घेऊन यायच्या. मात्र, स्वत:ला गंभीर आजार असताना दिव्यांग मुलीसाठी धडपडणाऱ्या पालकांची अशी चिकाटी क्वचितच दिसून येते, असे बालविकास केंद्राचे श्रीकांत आणि सुचिता बनसोड त्यांच्याविषयी सांगतात.

आईचे स्वप्न पूर्ण करणार
कृष्णाली नऊ वर्षाची आहे. ती अभ्यासात हुशार आहे. तिच्यासाठी आई-वडीलांची चाललेली धडपड तिने बघितली. त्यामुळे ती आई-वडीलांचे ऋण फेडण्याचे बोबडे बोल बोलते. मला मोठे होऊन मॅनेजर व्हायचे आहे, आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे ती सांगते.

ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो
कोरोना काळ आमच्यासाठी दुहेरी संकट घेऊन आला. ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. कृष्णालीकडे दुर्लक्ष होऊ नये, याची काळजी घेतली. त्यामुळे तिला सामान्य मुलांसारखे वाढवण्याचे स्वप्न आहे.
शारदा प्रशांत माळी कृष्णालीची आई

बातम्या आणखी आहेत...