आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नो वर्क नो पे’ चे उल्लंघन:शिक्षणाधिकारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता आनंद पाटेकर यांच्याविरूद्ध परभणी येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नो वर्क नो पे आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्यासह तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याने गुरुवारी शिक्षणाधिकारी या नॉटरिचेबल होत्या.

काय आहे प्रकरण?

डॉ. पाटेकर या परभणी येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी असतानाचे हे प्रकरण आहे. शासनाची 74 लाख 90 हजार 496 रूपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना अभिजित वाहूळ, तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता आनंद पाटेकर, मुख्याध्यापिका खायमखानी शहनाज बानो, सिद्दीकी मोहम्मद शरफोद्दिन मोहम्मद फैयजोद्दीन, शबाना बेगम खुर्शीद अली यांनी शासन निधीचा अपहार केल्याची तक्रार कारमेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोहम्मद मुश्ताक अहेमद मोहम्मद अली यांनी केली होती.

गुन्हा दाखल

मार्च 2019 ते जून 2020 या कालावधीत तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी संस्थेमध्ये अनुपस्थित असलेल्या शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी कार्यकत मुख्याध्यापक यांचे शासकीय अधिकार काढून घेऊन वेतन काढण्याकरता लागणारी स्वाक्षरीचे अधिकार दुसऱ्याला दिले. संबंधित मुख्याध्यापिकेने खोटे, दस्त, शिक्के तयार करून आरोपींशी संगनमत करत अनुपस्थित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दिले. शासनाच्या नो वर्क नो पे या आदेशाचे उल्लंघन करत शासन निधीचा अपहार केला. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता 34, 408, 1860, 409, 419, 420, 468, 471, 499, 501 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...