आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Final Reservation Announced In Akola Municipal Corporation There Is Still No Suggestion From The Election Commission Regarding The New Ward Structure

अकोला महापालिकेत अंतिम आरक्षण जाहीर होणार:निवडणूक विभागाकडून नव्या प्रभाग रचनेबाबत अद्याप कोणतीही सूचना नाही

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने 2017 नुसार प्रभाग रचनेचा निर्णय घेतला असला तरी अद्याप आयोगाकडून याबाबत कोणत्याही सुचना न आल्याने 5 ऑगस्ट रोजी प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहिर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाने दिली.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या अनुषंगाने हरकती व सुचना मागवण्यात आल्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी एकही हरकत दाखल झाली नाही. मात्र 2 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे माजी गटनेते राजेश मिश्रा यांनी हरकत दाखल केली. या हरकतीची दखल घेत 5 ऑगस्ट रोजी प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित

मागासवर्गीयांना महापालिका निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नंतर निवडणुक आयोगाने यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर केलेले आरक्षण रद्द करुन इतर मागासवर्गीयासाठी 29 जुलै रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात 91 पैकी 24 जागा इतर मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी १२ जागा इतर मागासवर्गीय (महिला)साठी आरक्षित करण्यात आल्या.

अनेक तर्कवितर्क

30 जुलै रोजी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र 3 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने 2017 च्या नुसार प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतल्याने प्रभागाचे आरक्षण जाहिर होणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर

राज्य शासनाने निर्णय घेतला असला तरी अद्याप राज्य निवडणुक आयोगाकडून प्रभाग आरक्षण रद्द करण्याबाबत कोणतीही सुचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ठरलेल्या कार्यक्रमानुसार ५ ऑगस्ट रोजी प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहिर करण्यात येईल. मात्र त्यापूर्वी काही सुचना आल्यास त्या सुचनेनुसार कार्यवाही केली जाईल. अनिल बिडवे, निवडणुक विभाग प्रमुख

बातम्या आणखी आहेत...