आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत २००९ पासून रखलेली जिल्हा परिषदेच्या शिक्षण िवभागातील पदोन्नती प्रक्रिया अखेर पार पडली असून, ११४ जणांवर नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र ५ ते ६ जणांनी वैयक्तिक कारणास्तव पदोन्नतीस नकार दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) विविध संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबिवण्यात येत आहे. पदोन्नतीची प्रक्रिया प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपूर्वी करणे गरजेचे असल्याने पदोन्नती समितीची सभा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सावित्रीबाई राठोड यांनी पदोन्नती प्रक्रियेच्या प्रस्तावाची फाईल स्वतःकडे ठेवली असल्याने ३० मे रोजी या बाबतची सभा झाली नाही.
परिणामी जिल्हा परिषदेच्या सीईओनी उपाध्यक्षांना पत्र देत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहिल, असे नमूद केले होते. त्यानंतर हे प्रकरण अध्यक्षांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान शनिवारी ही प्रक्रिया पार पडली. सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेला प्रामुख्याने जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्री राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.सुभाष पवार, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग उपस्थित होत्या.
चौकशीचे काय झाले ? पदोन्नती प्रक्रियेबाबत उपाध्यक्षा व जि.प. प्रशासनामध्ये पत्रांची देवाण-घेवाण झाली होती. नंतर अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी शिक्षण विभागाच्या फाइलमध्ये काही बाबींचा उहापोह केला होता. त्यांनी उपाध्यक्ष-शिक्षण सभापतींच्या अभिप्रायाचा संदर्भ दिला. पदोन्नती प्रक्रियेत कथित गैरव्यवहार करणे, अपात्र व्यक्तिंना पदोन्नती देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचेही नमूद केले होते. पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नेमकी कोणी चौकशी केली आिण त्यात काय आढळले, असे सवाल यानिमित्ताने करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.